जळगाव ( प्रतिनिधी ) – आधी एकाच दिवशी झालेल्या दोन खुनांनी खळबळ उडालेली असतानाच आज जळगावातील शिवाजीनगरात चॉपरहल्ल्यात तरुणाचा बळी आहे
जळगावातील थेट हल्ली करून सूद उगवण्यासाठी हत्याकांड घडवून आणणाऱ्या घटना वाढतच आहेत . अवैध शस्त्रांचा मुद्दा या घटनांनी पुन्हा चर्चेत आला आहे . काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी दोन खून झाल्यामुळे सामान्य माणूस भयभीत व्हावा असे चित्र निर्माण झाले होते आज पुन्हा शिवाजीनगर हुडको परिसरात खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक ( वय ४०, रा. शिवाजी नगर) यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला. या हल्ल्यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला व का केला ? , याची माहिती लगेच समोर आली नसली तरी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पोलीस तपासातच आता या हत्याकानाची पार्शवभूमी स्पष्ट होणार आहे .