जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील तळेगाव येथे आज सकाळी ९.३० वाजता सुभाष लक्ष्मण चांदेकर यांच्या घराजवळ झालेल्या शाँकसर्किटमुळे जवळजवळ चार घरे भस्मसात झाली. तळेगावातील या आगीत एका घराची अक्षरशः राख झाली असून शेजारच्या तीन घरांना तडे गेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते .
सकाळी साडेनऊ वाजता सुभाष चांदेकर धार्मिक कार्यक्रमानिमित्त बहिरोबा देवस्थानाजवळ गेले होते त्यांचे घर बंद होते याचवेळी त्यांच्या घराजवळ असलेल्या विजेच्या वायरमध्ये शॉर्टसर्किट झाले व घर पेटले त्यांच्या घरातून आगीचे , लोट धुराचे लोट निघू लागले लोकांच्या लक्षात येताच गल्लीतील तरुणांनी सुभाष चांदेकर यांच्या घराचे दार तोडले . परिसरातील तरुण मंडळी एकवटली तळेगावच्या जैनाबाद ग्रुप व शीवा ग्रुप मधील तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. कैलास कोळी, अरुण कोळी , सागर वंजारी, कृष्णा कोळी, उमेश माळी यांच्यासह 60 तरुणांनी जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले
गावावर आलेल्या या संकटप्रसंगी मोठा अनर्थ होणार होता तो टाळण्याचे निकराचे प्रयत्न केले तळेगावचे माजी सरपंच चत्तर सपकाळ यांनी स्वतःचे पाण्याचे टँकर घटनास्थळी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीने प्रचंड वेगाने पेट घेतल्यावर शेजारील डॉ.गजानन जाधव विश्वनाथ जाधव मथुराबाई कोळी यांच्या घरापर्यंतदेखील आग पोहचली होती . तरुणांनी या तीनही घरातील लोकांना त्वरित बाहेर काढले त्यामुळे जीवित हानी टळली . काही घरांमध्ये गँस हंड्या असल्याने त्या बाहेर काढण्यात आल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अनेकांनी जामनेरहुन नगरपालिकेची अग्निशामन दलाची गाडी मागवण्यासाठी फोन केले परंतु नगरपालिकेची गाडी दुरुस्तीसाठी बाहेरगावी गेलेली असल्यामुळे सर्व व्यर्थ ठरले. माजी पंचायत समिती सभापती नवल पाटील यांनी भुसावळ नगरपालिकेकडून अग्निशामन दलाची गाडी मागवली परंतु तोपर्यंत ग्रामस्थांनी बऱ्याच अंशी आगीवर नियंत्रण मिळवले होते. तरीदेखील आगीने या चारही घरातील जीवनावश्यक वस्तू खाक केल्या होत्या . चांदेकर यांच्या घरातील सुतार कामाचे साहित्य, लाकडे, अन्नधान्य ,भांडीकुंडी , कपडालत्ता , पैसाअडका जळून खाक झाला उर्वरित तीन घरांच्या भिंतीला तडे गेले
घराचे छत मातीचे असल्याने प्रचंड नुकसान झाले
तळेगावच्या सरपंच आरती कोळी , पोलीस पाटील जयश्री सानप ,भाजपा कार्यकर्ते राजेश लोढा, माजी सभापती नवल ,पाटील यांनी तात्काळ पंचनामा व्हावा यासाठी तलाठी साळुंके ,ग्रामसेवक तायडे यांना घटनास्थळी बोलवले. त्यांनी पंचनामा केला .
तळेगावच्या सरपंच आरती कोळी यांनी चांदेकर यांना तातडीची मदत म्हणून अडीच हजार रुपयांचा किराणा घेऊन दिला या घरांचे घरकुल प्रस्ताव ग्रामपंचायतकडे प्रस्तावित असल्याने घरांसाठी तातडीचे प्रयत्न करू असे सरपंच आरती कोळी यांनी सांगितले
आमदार गिरीश महाजन यांची भेट
घटनेची माहिती समजल्यावर आमदार गिरीश महाजन यांनी या गावाला भेट दिली व ग्रामस्थांचे सांत्वन केले या कुटुंबास शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आणि चारही घरांचे नुकसान झाल्याने या लोकांना घरे मिळवून द्यावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले यावेळी त्यांच्या समवेत राजेश लोढा, नवल पाटील, अरुण कोळी, नाना माळी, प्रशांत वाघ व कार्यकर्ते उपस्थित होते.