जळगाव ( प्रतिनिधी ) – अहिर सुवर्णकार महिला मंडळच्या माजी अध्यक्षा वैशाली विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकूवाचा कार्यक्रम नुकताच झाला . यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अहिर सुवर्णकार महिला मंडळ जळगावात ३५ वर्षांपासून अखंड सक्रिय आहे.
माजी अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी नूतन अध्यक्षा रंजना वानखेडे यांना पदभार सोपविला. नुतन अध्यक्षा रंजना वानखेडे यांनी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव यांचा प्रकर्षाने नामोल्लेख करीत म्हटले की, या संघटनेने आम्हाला आजवर बळ दिले आहे त्या बळावरच महिला मंडळ निरंतर समाजकार्य करीत आहे. महिलांचा वैचारिक व आर्थिक स्तर वाढवावा यासाठी भक्कम महिलांची अखंड साखळी तयार करीतच राहीन असेही त्या म्हणाल्या .
माजी अध्यक्षा वैशाली विसपुते यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
नव्या कार्यकारिणीत अध्यक्षा- रंजना वानखेडे. उपाध्यक्षा- संगीता विसपुते , सचिव – राजश्री पगार , कार्याध्यक्ष – विजया जगताप , खजिनदार- सुवर्णा बागुल , सदस्या – प्रमिला बाविस्कर , रुपाली भामरे , मनीषा रणधीर , अनिता सोनार, सविता मोरे , सारिता विसपुते , कांचन विसपुते., लता मोरे ,
सारिता दुसाने , स्वाती सोनार , आशा अहिरराव यांचा समावेश आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पगार व आभारप्रदर्शन शुभांगी वानखेडे यांनी केले.