पाचोरा कृष्णापुरी सोसायटी निवडणुकीत १३ उमेदवार विजयी
पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बहुचर्चित कृष्णापुरी विकास सोसायटीच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांच्या परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला भाजपप्रणीत अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला सर्वच्या सर्व जागा जिंकून घवघवीत यश मिळाले.
प्रथमच पाचोरा तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. .गेल्या २२ वर्षांपासून कृष्णापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर सतीश शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व असून त्यांच्या पारदर्शी कारभारास शेतकरी सभासदांनी स्वीकारले एकेकाळचे कट्टर विरोधक आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मनोमिलनातून परिवर्तन पॅनल तयार झाले होते अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाले सर्व १३ जागांवर शेतकरी पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत ८२६ सभासद असलेल्या कृष्णापुरी सोसायटीत सुमारे अडीच कोटीच्या ठेवी असून शंभर टक्के वसुली व नफ्यातील संस्था म्हणून सतीश शिंदे यांनी २२ वर्षापासून कारभार हाताळला आहे त्याचे फलित म्हणून शेतकऱ्यांनी कृष्णापुरी सोसायटीवर पुनश्च सतीश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी पॅनलला घवघवीत यश दिले आहे. अमोल शिंदे व सतीश शिंदे यांच्यासह विजयी उमेदवारांनी ढोल ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत जल्लोष केला ही निवडणूक म्हणजे पाचोरा नगरपालिकेची रंगीत तालीम असल्याचे शहरात चर्चिले जात होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले की कृष्णापुरी विकास सोसायटीत २२ वर्षापासून सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या आत्मविश्वासाने शेतकरी हित जोपासत संस्था अबाधित ठेवली निस्वार्थ भावनेने सोसायटीचा कारभार चालू ठेवला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्णपणे विश्वास ठेवून विजय मिळवून दिला. जी-माजी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र शेतकऱ्यांनी त्यांना नाकारले आहे.