जळगाव ( प्रतिनिधी ) – युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारच्या उपरोधिक अभिनंदनाचा सोहळा नशिराबादेतही राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता .
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले नशिराबाद बाजारपेठेत युवासेना ग्रामीणतर्फे थाळी वाजवून, घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, सहसचिव विराज कावडीया, जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, नशिराबाद शहरप्रमुख चेतन बर्हाटे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, विनय लाड, अतुल वंजारी, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, सरपंच विकास पाटील, सं.गा.यो सदस्य चंदु भोळै, नितीन बैंडवाल , विशाल सोनवणे, प्रकाश कनगरे , निलेश धनगर, मनोज देशमुख, कैलास नेरकर, आबा माळी, दर्शन झटके, निलेश नाथ, दिनेश माळी, वासु कोलते , महैंद्र कोळी, मनोज नाथ, पराग देवरै , तनवीर सर , फिरदोस सय्यद, करीम शैठ , सत्तार मेंबर,प्रकाश महाजन, चंद्रकांत पाटील , नोमदास रोटे, संदीप पाटील, दगडु माळी , आप्पा धर्माधिकारी आदी युवासैनिक ऊपस्थित होते.