चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – मुलांच्या भांडणाच्या भांडणावरून वरून एका गावातील ४० वर्षीय विवाहितेला मारहाण करून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गावात ४० वर्षीय महिला कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या मुलासोबत एकाचा वाद झाला होता. ३१ मार्च रोजी सायंकाळी महिला व तिचे पती घरी असताना गावातील रवींद्र निवृत्ती कुमावत मुलांच्या भांडणाच्या कारणावरून विवाहितेच्या घरी आला व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर शिवीगाळ का करतो असा जाब विचारला असता रागातून निवृत्ती याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व महिलेचा साडीचा पदर ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. महिलेच्या गळ्यातील पॉट तुटून नुकसान झाले आहे. महिलेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवींद्र निवृत्ती कुमावत याच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.