जळगाव (प्रतिनिधी) – शहरात शुक्रवारी चॉपर हल्ल्याची घटना संध्याकाळी घडली या घटनेमध्ये महिलेच्या डोक्यावर चॉपरने वार झाला तिचा मुलगा देखील जखमी झाला गुन्हेगार तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली गुन्हेगारांवर पोलिसांनी अंकुश ठेवला पाहिजे अशी मागणी कुटुंबीयांनी केली
मूनकाबाई बिऱ्हाड़े (वय ४०), मंगल सचिन बिऱ्हाड़े (वय २०) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. मटन मार्केट जवळील वसाहतीमध्ये मूनकाबाई दोन मुले, सून, नातवंडे यांच्यासह राहतात. शुक्रवारी संशयित आरोपी दिपक गायकवाड नशेमध्ये विनाकारण शिवीगाळ करीत अरेरावी करू लागला. याचा जाब अंगणामध्ये काम करीत असलेल्या मुनकाबाई यांनी विचारला. त्याचे वाईट वाटून दिपक गायकवाड याने मूनकाबाई हिच्या डोक्यावर चोपरने वार करून धक्का मारला.
मूनकाबाई गंभीर जखमी झाली. दिपक गायकवाड याला आवरण्यास गेलेल्या मुनकाबाई यांचा मुलगा मंगल याला ही हाताजवळ वार लागला आहे. गंभीर जखमी अवस्थेमध्ये कुटुंबीयांनी मूनकाबाई व मंगल यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले. संशयित दिपक गायकवाड गुन्हेगार असून सतत नशेत राहून परिसरातील नागरिकांना त्रास देत असतो.