जळगाव ( प्रतिनिधी ) – तरूणाच्या त्रासाला कंटाळून जळगावातील विवाहितेने घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून संशयित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला .
मेहरुण परिसरातील नशेमन कॉलनीत सैय्यद हुसेन शाहीद हुसेन कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. संशयित तौसिफ शाह तफज्जुल शाह ( रा. सालार नगर ) हा सैय्यद हुसेन यांच्या घरी जावून त्यांच्या पत्नीकडे वाईट नजरेने बघून तीची छेड काढत होता. व्हाट्सऍपवर मॅसेज व व्हिडीओ कॉल करुन तिला त्रास देत होता. तौसिफच्या या छळाला कंटाळून विवाहितेने २३ मार्च रोजी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. पोलिसांनी चौकशी करुन सैय्यद मुजाहीद हुसेन शाहीद हुसेन याच्या फियादीवरून संशयीत आरोपी तौसीफ शहा तफज्जूल शाह याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि दीपक जगदाळे हे करीत आहेत.