चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – वाढदिवस समाजाप्रती दायित्वाचा सोहळा व्हावा या हेतूने प्रभाग क्र.१५ मधील अमोल चौधरी यांनी वाढदिवसानिमित्ताने 30 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आणखी 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या शैक्षणिक साहित्यामध्ये दप्तर, वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर देण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.
अमोल चौधरी यांनी चाळीसगाव किक बॉक्सिंग क्लबला ज्या बॉक्सिंग खेळणाऱ्या मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे बॉक्सिंग साहित्य खरेदी करता येत नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी बॉक्सिंग किट दिली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी अमोल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त लकी स्टार क्रिकेट क्लब आयोजित किटकॅट बॉल क्रिकेट स्पर्धेच्या प्रथम विजेत्या राष्ट्रीय क्रीडा मंडळ या टीम ला 31000/- बक्षीस दिले. इम्रान शेख यांनी द्वितीय विजेत्या लकी स्टार क्रीडा मंडळ ला 21000/- व अमोल चौधरी यांनी तृतीय विजेत्या लकी स्टार बी क्रीडा मंडळाला 11000/- बक्षीस वितरण शिवनेरी फौंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते झाले. अमोल चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या प्रमाणात हजर होती.