जळगाव ( प्रतिनिधी ) – जालना जिल्ह्यातून चोरीला गेलेले जेसीबी विकत घेणाऱ्या जळगावच्या आरोपीला आज पोलिसांनी अटक केली .
कुंभारझरी पेट्रोलपंपाच्या बाजुला ( जाफराबाद , जि – जालना ) येथून २८ फेब्रुवारीरोजी ७ लाख ख्पये किंमतीचे जेसीबी चोरी झाले होते. याबाबत देवराज सोनसाळे ( रा, जाफ़ादाद जि जालना ) यांनी जालना जिल्ह्यातील टेम्भूर्णी पोलीस ठाण्यात किर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता टेम्भूर्णी पोलिसांचे पथक आज जळगावच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनला आले होते त्यांनी माहीती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक घनावडे यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली की ते जेसीबी मशिन नंदलाल मोर्या ( रा, ऑटो नगर अशोक नगर दत्त मंदीराजवळ जळगांव ) याने विकत घेतले आहे त्यावरून पोलिसांनी त्याला दुस्दर्शन टॉवर येथुन ताब्यात घेतले व चौकशी केल्यावर त्याने जेसीबी विकत घेतल्याच्या गुन्हयाची कबुली दिली होती. त्याच्या साथीदाराने जेसीबी चोरण्यासाठी वापरलेली आयशर मिनी टक ( क एमएच 18 / 0501 ) व रोख १५ हजार रुपये जप्त करण्यात आले त्यास टेभुणी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण चनावडे , स फौ अलुल वंजारी, पोना. ईमरान सैय्द, पोना योगेश बारी, पोका गोविंदा पाटील यांनी केली.