जळगाव (प्रतिनिधी );- येथील पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली झाल्याची अफवा शहरात पसरली व त्यांची बदली होऊ नये म्हणून शहरातील एका तरुणाने व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज टाकत येथील पोलिस ठाण्यामध्ये लॉकडाऊन असूनही गर्दी जमवली म्हणून त्याच्याविरुद्ध दि.27 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमाव जमविण्याची घटना दिनांक 25 रोजी संध्याकाळी घडली होती. एकुणच पोलिस अधिकार्यांवर दाखवलेले प्रेम आणि प्रमोशनसह बदली झाल्याची आणि सत्कार स्विकारण्याची चमकोगिरी करणार्या पोलीस निरीक्षक धनवडेसह यावल पोलीस स्टेशन आवारात जमाव जमविणार्याना मोठी चपराक बसली आहे.
यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली झाल्याची अफवा काही दिवसांपासून शहरात आहे. बदली झाल्याची अफवा कोणी व का पसरविली हेसुद्धा यावलकरांना ज्ञात आहे स्वतः पोलीस निरीक्षक या अफवेला दुजोरा देत चमकोगिरी करीत होते. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले होते का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बदली झाली आहे हे सांगून पोलीस निरीक्षक लोकांकडून शुभेच्छा स्विकारीत होते आपल्याला थोडाच वेळ यावल शहराकरिता मिळाला असे सांगत खंतदेखील व्यक्त करीत आहे! अधिकृत बदलीचे पत्र येण्याआधीच अनेकांनी त्यांना निरोपदेखील देऊन टाकला अनेक जणांनी त्यांचे काम वाखाणण्याजोगे असल्याने त्यांची बदली नकोे म्हणून सोशल मीडियावर पोस्टींचा रतीब घातला होता.
शहरातील आकाश चोपडे व त्याच्या एका साथीदाराने शनिवारी व्हाट्सअप वर एक पोस्ट टाकून पोलिस ठाण्यात गर्दी जमवली जमाव रात्री आठ वाजता एकत्र झाला होता या जमावाला पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी पांगवले मात्र, गर्दी जमली म्हणून संचारबंदी नुसार आकाश चोपडेसहित अज्ञात वीस जणांविरुद्ध यावल पोलिसात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी यावल शहरातील अनेक तरुणांनी शहरात दारोदार फिरून अंदाजे 5 हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन तयार केले असल्याने या गुन्ह्यात त्यांची सुद्धा चौकशी होऊन साक्षीपुरावे होणार असल्याचे सांगितलेे जात आहे.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांनी मनावर घेतल्याने हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले .