चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा शहरातील पवार नगरातून तरुणाची ३५ हजार रुपये किमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल सुदाम चौधरी (वय-३०) रा. पवार नगर चोपडा हे खाजगी व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार १८ मार्च रोजी पहाटे ७ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांची (एमएच १९ सीई ०२४३) क्रमांकाची दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहे.