जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आयोजित कोविड-१९ लसीकरण शिबिरात १०५६ लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले .
आज मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. इरेश पाटील यांचे नियोजनात ७ टीम तयार करून नशिराबादसह कंडारी, उमाळा, चिंचोली कुसुम्बा, रायपूर या गावात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले
१२ ते १४ वयोगटासाठी (कोर्बोवॅक्स लस) पहिला डोस:- ३४४ , १५ ते १८ वयोगटासाठी (कोवॅक्सिन लस) पहिला डोस:- ५८ व दुसरा डोस:- १३८ , १८ वर्षे वयोगटा वरील सर्व (कोविशिल्ड लस) पहिला डोस:-६० व दुसरा डोस:- ४३७ , ६० वर्षावरील नागरिकांसाठी बूस्टर डोस:-१९ असे १०५६ लाभार्थीनी कोविड १९ लसीकरण शिबिरात एकाच दिवशी लाभ घेतला
वैद्यकीय अधिकारी डॉ इरेश पाटील व डॉ. चेतन अग्निहोत्र यांच्या नेतृत्वात औषध निर्माण अधिकारी- अशोक पाचपांडे, आरोग्य सहाय्यक- पी.डी. कोळी,
आरोग्य सहाय्यीका- सुषमा महाजन, डी. आर.चौधरी, समुदाय आरोग्य अधिकारी- डॉ. तुषार राणे, डॉ. अक्षय पाटील, डॉ विकास जोशी, डॉ. शोएब पटेल, डॉ जयश्री सोनार, आरोग्य सेवक- सुनील ढाके, प्रकाश पाटील, रवींद्र पवार, शेखर हिवरे, दिलीप ठाकूर, आरोग्य सेविका- आर. जी. पटेल, भारती कोळी, बफी साळुंके, योगिता कोकाटे. ऑपरेटर- राकेश कुदळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्व टीमने मेहनत घेतली सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.