नंदूरबार (वृत्तसंस्था) – गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. मात्र आजच्या तपासणी अहवालात दोन रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 13 वर पोहचली आहे.
आजचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण त्यातला एक अक्कलकुवा प्राथमिक आरोग्य केंद्राचा 58 वर्षीय वाहन चालक आहे. तर दुसरा रुग्ण शहादा शहरातील 15 वर्षीय मुलगी आहे. ही मुलगी गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती. या दोघांची हिस्ट्री तपासली जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी खोकला, ताप असल्यास , श्वास घेताना त्रास होत असल्यास असे काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासन कडून करण्यात येत आहे.