जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय नाहाविद्यालय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या हल्ल्याच्या गुन्ह्यातील तिसरा आरोपी शुभम सपकाळे याला आज पोलिसांनी पोलीस मित्रांच्या मदतीने अटक केली .
सिव्हिल हॉस्पिटल गेटसमोर जमाव जमवून अरुण गोसावी व सुरज ओतारी यांचेवर कोयता व लाकडी दंडक्याने प्राणघातक हल्ला केल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भा द वि कलम 307,143,147,148,149,504,506,34, प्रमाणे 18 मार्चरोजी गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्यात आरोपी सचिन चौधरी आकाश ठाकूर यांना आधी अटक झाली होती , तीन पोलीस मित्राच्या मदतीने तिसरा आरोपी शुभम सपकाळे ( रा पिंप्राळा ) यास आज पोलिसांनी अटक केली या गुन्ह्यायील २ विधिसंघर्षग्रस्त आरोपी बालकांना ताब्यात घेऊन पालकांचे ताब्याचे दिले आहे.
आणखी 4 आरोपी फरार असून आरोपीचा शोध चालू आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार, हे कॉ महेंद्र पाटील, सलीम तडवी , पो ना गणेश पाटील , पो कॉ विकास पहुरकर, योगेश साबळे , विनोद पाटील, समाधान पाटील हे तपास करीत आहेत.