क्रिकेट मध्ये प्रथम वर्ष बीटेक संघाने तर फुटबॉल स्पर्धेत प्रथम वर्ष डिप्लोमा संघाने विजेतेपद पटकावले
जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे नुकताच वार्षिक क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटनासाठी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते, डॉ.केतकी पाटील यांनी फुटबॉलला किक मारून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी दीपक झांबरे, ईश्वर जाधव, हेमंत इंगळे, डॉ. नितीन भोळे, डॉ. प्रमोद गोसावी, अतुल बराटे, तुषार कोळी, डॉ. विजयकुमार वानखेडे, शफिक रहमान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आसिफ खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
क्रिकेटमध्ये १०, फूटबॉल मध्ये ६ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. तसेच बॅडमिंटन मुली मध्ये बिमला ददीराम पोखरेल यांनी विजेतेपद पटकावले.
२०२१-२२ या वर्षाला प्रथम वर्षाचे खेळाडूंनी मैदान गाजवले.
क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. आसिफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खेळाडूंनी आपला मोलाचे सहकार्य केले.