जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन या संस्थेकडून 20 मार्च या जागतीक चिमणी दिनानिमीत्त पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी 100 परळ व धान्याच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले.
रविवारी सकाळी नवीन बसस्टॅडमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उदयोगपती पारसमल टाटीया, सहयाक वाहतुक निरिक्षक महेश शर्मा, डॉ अमीत वर्मा उपस्थित होते . त्यासाठी सहकार्य डॉ अमीत वर्मा व एस टी डेपो कर्मचाऱ्यांचे लाभले . अध्यक्ष श्रीकांत वाणी, पंकज जैन, डॉ विजय साखला, योगेश कलंत्री, केतन वाणी व इतर सदस्य उपस्थित होते.