जळगाव ( प्रतिनिधी ) – चिंचोली शिवारातून राधाकृष्ण मंगल कार्यालयासमोरून व्यापाऱ्याची मोटारसायकल चोरीला गेली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धालवडी येथे राजेंद्र एकनाथ मानके वास्तव्यास आहेत. ते १३ मार्च रोजी चिंचोली शिवारातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे आले होते. त्यांनी मंगल कार्यालयासमोर त्यांची एम.एच १९ बी.के.२११३ या क्रमांकाची मोटारसायकल उभी केली होती. दुपारी काम आटोपून परत जाण्यासाठी निघाले असता त्यांना मंगल कार्यालयासमोर उभे केलेले त्यांची मोटारसायकल सापडली नाही चार दिवस सर्वत्र शोध घेतला मात्र मोटारसायकल मिळून न आल्याने राजेंद्र मांडके यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो हे कॉ गफूर तडवी हे करीत आहेत.