• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाण्यासाठी कुसुंब्याच्या ग्रामपंचायतीला कुलूप ; महिला संतापल्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 19, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या जवळपास ३३ दिवसांपासून कुसुंबा खुर्द गावात पाणीपुरवठा झालेला नसल्याने आज महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला . सुमारे शेकडो महिलांनी सकाळीच ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच आणि सदस्यांना जाब विचारायचा आहे , त्यांना बोलवून घ्या अशी आग्रही मागणी केली . आपल्या समस्येची समाधानकारक उकल होत नसल्याचे लक्षात आल्यावर या महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले .

https://kesariraj.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Video-2022-03-19-at-1.36.18-PM.mp4

फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत , पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल भरायला पैसे नाहीत अशी कारणे सांगितली जात आहेत . ग्रामपंचायत या अडचणींचा काहीच विचार करणार नसेल तर ग्रामस्थांनी पाण्याची आशा सोडून द्यायची का ? , असा रोकडा सवाल या महिला विचारत होत्या . त्यांच्याशी बोलण्यासाठी सरपंचांचा मुलगा आला होता मात्र तोही समाधानकारक खुलासा करू न शकल्याने पुन्हा महिलांनी कडक भूमिका घेतली होती . या महिलांनी सरपंचांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आणि आमच्याकडून काहीच काम होणार नाही असे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी लिहून द्यावे , अशी मागणी या महिलांनी केल्यावर ग्रामसेवकाने केलेला शिष्टाईचा प्रयत्नही अपयशी ठरला होता .

ग्रामसेवकाने आरोप फेटाळला ….

थकबाकीमुळे २ दिवसापूर्वी पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी तोडली आहे २ दिवसात थकलेल्या ९० हजार रुपये वीजबिलापैकी २० हजार बिल भरून आम्ही पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन सुरु करण्याचा प्रयत्न करू असे ग्रामसेवक शरद सूर्यवंशी यांनी ‘ केशरीराजशी बोलताना सांगितले , मात्र असले तरी ३३ दिवसांपासून पाणी पुरवठा थांबवला जाण्याचे नेमके कारण काय आहे ? हे स्पष्ट झाले नव्हते . ३३ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याच्या या महिलांच्या आरोपात तथ्य नाही , असेही ग्रामसेवक शरद सूर्यवंशी म्हणाले .

महिलांच्या या उत्स्फूर्त आंदोलनात शोभाबाई कोळी , वंदना राठोड , मनीषा खैरनार , अनिता पाटील , संगीता पाटील यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या .


 

 

Tags: #kusumba news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मेहूणबारे शिवारात डोक्यात कुऱ्हाड मारून मद्यपी पत्नीचा खून

Next Post

पुण्यात ११ वर्षीय मुलीवर सहा वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामाकडून अत्याचार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुकबधीर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला अटक

पुण्यात ११ वर्षीय मुलीवर सहा वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामाकडून अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon