अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर शहरातील पैलाडजवळील पारोळा रस्त्यावर भरधाव वेगाने धावणार्या वाळूच्या ट्रकने चिरडल्यामुळे दुचाकीस्वार जागीच झाल्याची घटना शहरात घडली.
शहरातून पारोळ्याकडे जाणार्या वाळूच्या ट्रकने चिरडल्याने, दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात पैलाडजवळील पारोळा रस्त्यावर झाला असून बापू लोंढू पाटील (वय ४९,रा.ताडेपुरा, अमळनेर) असे मृताचे नाव आहे.
ते आपल्या दुचाकीने जात असताना मागून वाळू भरलेल्या क्र.एम.एच.२१-एक्स.८१२८ या क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात बापू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचा ड्रायव्हर अपघात स्थळावरून फरार झाला. या संदर्भात अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.