सावदा ( प्रतिनिधी ) – सावदा येथून जवळ असलेल्या खिरोदा गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन आयशरची समोरासमोर धडक दिल्याने चालकांसह २५ ते ३० जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.
वाघोदा बुद्रुक येथील लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणारा आयशर ट्रक (एमएच १९ जे ७७३८) ची खिरोदा गावाच्या पुढे पालकडून येणारी दुसरी आयशर (एमएच १८ एए २०२०) ही भरधाव वेगाने येत असतांना दोघांची समोरासमोर धडक देवून अपघात झाला. ही घटना रविवारी १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वऱ्हाडी घेवून जाणाऱ्या ट्रकमधील २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहेत.