जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील तुकारामवाडी भागात दहशत पसरवणाऱ्या २ समाजकंटकांना आज एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे .
हे आरोपी तुकारामवाडी परिसरात दहशत निर्माण करतात याची माहिती मिळाल्यावर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती त्यांचेवर मारहाण करणे असे सहा गुन्हे दाखल असून त्यांची तुकारामवाडी परिसरात दहशत आहे भूषण माळी ( वय २२ ) व पवन बाविस्कर अशी या आरोपींची नावे आहेत . ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील ,चेतन सोनवणे , गोविंदा पाटील यांनी केली .