यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील बामणोद येथे विहिरीचे खोदकाम करतांना मोयखेडा दिगर ( ता. जामनेर ) येथील दोन मजूरांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली
बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल ( दोन्ही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर ) असे मयत झालेल्या मजूरांची नावे आहे. बामणोद गावातील झांबरे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. खोदकाम करत असतांना अचानक दोर बांधलेला लोखंडी खुंटा उपटल्याने काम करणाऱ्या बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल या दोन्ही मजूरांना तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना १० मार्च रोजी रात्री घडली. माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर, पोउनि मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.ना. किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप हे घटनास्थळी दाखल झाले रात्री अंधारात मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व शोध घेणे शक्य न झाल्याने सकाळी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले