जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल यांची सुपर स्पेशालिटी फूट अँड अँकल ऑर्थोपेडिक ओ. पी. डी. आता जळगाव मध्ये सुरु झाली असून यामध्ये हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करण्यासाठी शनिवारी जळगावात येत आहेत .
रुग्णांनी आपल्या पाऊल आणि घोट्याचे दुखणे, पायांना मुंग्या येणे, डायबेटिक फूट, पाय बधिर होणे, गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, टाचदुखी तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे. आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी करावी , अशी माहिती डॉ. श्याम ठक्कर यांनी दिली
जळगावात शनिवारी ( १२ मार्च रोजी ) आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड, महेश मार्ग येथे रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उपस्थित राहावे , असे आवाहन आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे . तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणी करावी व अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी +91 – 9673859185 या क्रमणकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .