जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील प्रख्यात नीलकमल हॉस्पिटलकडून ८ ते १६ मार्चदरम्यान किडनी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेतलेले डॉ मनोज टोके या किडनी सुरक्षा सप्ताहात रुग्णांच्या तपासण्या आणि उपचार करीत आहेत .
या विशेष सप्ताहात रुग्णांसाठी नाममात्र १०० रुपये नोंदणी शुल्क असून शुगर , क्रियाटिन आणि लघवी तपासणी मोफत केली जात आहे . सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत रुग्णांची तपासणी केली जात आहे . नीलकमल हॉस्पिटलमध्ये किडनीच्या सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहेत . हिमोडायलिसिस युनिटसह अतिदक्षता विभाग आणि डिलक्स , स्पेशल , सेमी -स्पेशल व जनरल वार्ड सुविधा आहे . विविध वैद्यकीय विमा कम्पन्यांच्या कॅशलेस सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत .
सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्याखाली आणि चेहऱ्यांवर सूज दिसणे , हात आणि पायांना मुंग्या येणे , भूक कमी लागणे , मळमळ होणे , उच्चं रक्तदाब , साखर नियंत्रणात नसणे , लघवी करताना जळजळ होणे , लघवी थेम्ब थेम्ब होणे , लघवीतून रक्त येणे , दम लागणे , शरीरातील रक्त कमी होणे , मुतखडा , गाऊट आणि डायलिसिस बद्दल समस्या असलेल्या रुग्णांसाठी ही संजीवन संधी आहे .
पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नीलकमल हॉस्पिटलशी गरजू रुग्णांनी ०२५७-२२२०७०८ किंवा ९०२१७९३९५८ आणि ७८४३०१६२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.