जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या नोव्हेंबरमध्ये युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या व महानगर अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये ४० हजार युवकांची नोंदणी करण्यात आली तब्बल २४ हजार युवकांनी देवेंद्र मराठे यांना पसंती देऊन विजयी केले महानगर अध्यक्षपदी म्युझिक पटेल यांना दीड हजार मतांनी निवडून दिलं
या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांचे समर्थक समजले जाणारे हितेश पाटील व माजी खा डॉ उल्हास पाटील यांचे समर्थक समजले जाणारे देवेंद्र मराठे मैदानात होते . देवेंद्र मराठे यांनी त्यांच्या एन एस यु आय जिल्हाध्यक्ष पदाच्या ११ वर्षच्या काळात केलेल्या उत्तम कामगिरीवर हे यश मिळाले आहे या निवडीचे संपूर्ण श्रेय प्रदेश उपाध्यक्ष मा खा डॉ उल्हास पाटील, गोदावरी फौंडेशनचे डॉ प्रशांत वारके, बाबा देशमुख, शोएब पटेल व सर्व युवक मतदार यांना जाते
प्रदेश अध्यक्ष नाना पटोले , भटके-विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी , प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सचिव विनोद कोळपकर , जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अविनाश भालेराव, प्रदेश युवक सरचिटणीस मुक्तदीर देशमुख , महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ , अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे , रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , राहुल बाहेती, डॉ शोएब पटेल, नदीम काझी यांनी मराठे यांचे अभिनंदन केले आहे
२००७ साली अभियांत्रिकी शिक्षण घेण्याकरता एक विद्यार्थी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दाखल झाला. प्रथम वर्षापासूनच गुणवंत म्हणून सर्वच प्राध्यापकांच्या नजरेत हा विद्यार्थी होता. हा विद्यार्थी प्रथम वर्षांमधील आपल्या क्लासचा वर्गप्रतिनिधी झाला. प्रथम वर्षांमध्ये युनिव्हर्सिटी टॉपर म्हणून या विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे व नाव लौकिक केले. एन एस यु आय या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक ही २००८ झाली सुरू झाली या निवडणुकीमध्ये माजी खासदार डॉ उल्हास दादा पाटील यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्याला या निवडणुकीमध्ये आपला स्वतःचा उमेदवार म्हणून एनएसयूआय जिल्हाध्यक्षपदासाठी उभे केले जिल्हाध्यक्ष पदी मोठ्या मतांनी विजय मिळाला. यानंतर सलग चार वेळेस एन एस यु आय जिल्हाध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळाला .