जळगाव ( प्रतिनिधी ) – मलेरीया दक्षता कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सन २०२२ते २०२७ या कालावधीच्या संचालक मंडळाची ११ जागांसाठी निवडणुक ६ मार्चरोजी घेण्यात आली., परीवर्तन पॅनल व स्वराज्य पॅनलचे १८ उमेदवार मैदानात होते परीवर्तन पॅनलचे ८ व स्वराज्य पॅनलचे १ असे उमेदवार विजयी झाले. परीवर्तन पॅनलची महिला उमेदवार बिनविरोध विजयी झालेली आहे.
या विजयी उमेदवारांची नावे व कंसात त्यांना मिळालेली मते अशी आहेत – अमोल इंगळे (१५५) , धनराज सपकाळे (१५२) , विपुल लोणारी (१४७) , महेंद्र पाटील (१३३) , रहेमान तडवी (१२७) , आबा पाटील (११२) , प्रदिप पटेळ (११०) , विजेंद्र पवार (१०३) , निलीमा येलगीरे ( बिन विरोध निवड)