रावेर ( प्रतिनिधी ) – ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन वैयक्तिक लाभ म्हणून ७३ अपंग बांधवांना प्रत्येकी एक हजार धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले यापैकी काही अपंग लाभार्थ्यांनी आपल्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी, मिळकत कर थकबाकीत भरणा करुन लाभ घेतला

ज्या लाभार्थ्यांकडे घर नाही त्यांना चेक देण्यात आले यावेळी सरपंच मुबारक तडवी , ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर , उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी , माजी सरपंच कालू मिस्तरी , सदस्य नितीन सुपे, संजय माळी , भुषण चौधरी , उदय पाटील, हाजराबी पिंजारी , प्रमिला भालेराव, अमिना तडवी, हर्षा पाटील, मिनाक्षी पाटील , साधना महाजन , भाग्यश्री वाघ , संगिता पवार , सुमनबाई कापसे, क्लार्क प्रकाश वायके , पंकज मालखेडे , सुनिल पाटील , राहुल महाजन , अजय कराड , भुषण नेहते आदी उपस्थित होते.







