जळगाव ( प्रतिनिधी ) – दारू पिण्यासाठी दोनशे रुपये देण्यास नकार दिला म्हणून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मारहाण केल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात घडली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील पांडे चौक परिसरातील ऋषिकेश अनिल मोरे (वय २२ ) शुक्रवारी रेल्वे स्टेशन परिसरात तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेला होता. या ठिकाणी त्याला राहुल अर्जुन भगत (रा.केसी पार्क कानदळा रोड ) याने दारू पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिला असता राहुल भगत याने हृषिकेश याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तसेच डाव्या बाजूचे चेहऱ्यावर मारली. या घटनेत ऋषिकेश यास गंभीर दुखापत होवुन डोक्यात दोन तर चेहऱ्यावर सहा टाके पडले आहेत. जखमी ऋषिकेश याने शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून राहुल भगत याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सहायक फौजदार भावराव इंगळे हे करीत आहेत.