जळगाव ( प्रतिनिधी ) – गोलाणी मार्केट येथून एकाची २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल शिवाजी पाटील (वय-३३, रा. रायसोनी नगर ) हा खासगी नोकरीला आहे. ४ मार्च रोजी दुपारी शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आला. गोलाणी मार्केट परिसरात मोटारसायकल क्रमांक (एमएच ०९ एनआर ५०५७) लावली. काम आटोपल्यानंतर विशाल पाटील यांना मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. त्यांनी परिसरात व गोलाणी मार्केट पूर्ण शोधून काढली परंतु त्यांना कुठेही दिसून आले नाही. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यांच्या तक्रारीवरून ५ मार्च रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो ना गजानन बडगुजर करत आहे.