जळगाव ( प्रतिनिधी ) – दादावाडी येथील माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेस लग्नात हुंडा कमी दिला म्हणून पतीकडून मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ५ मार्च रोजी पतीसह सासूवर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दादावाडी माहेर असलेले सपना गोपाल मराठे (वय-२८) यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील नाव्हे येथील गोपाल तुकाराम मराठे यांच्याशी ५ मार्च २०१७ रोजी झाला. लग्नाच्या १ महिन्यानंतर पती गोपाल मराठे याने सांगितले की, मला लग्नात हुंडा कमी दिला व माझ्यासह माझ्या नातेवाईकांना पाहिजे असा मानपान दिला नाही म्हणून सतत टोमणे मारने सुरु केले. मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. सासूने देखील गांजपाठ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता सपना मराठे या दादावाडी येथे माहेरी निघून आल्या. ५ मार्च रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती गोपाल मराठे, सासु सुंदराबाई मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना विश्वनाथ गायकवाड करीत आहे.