पारोळा ( प्रतिनिधी ) – काल भोलाणे शिवारातील बबलू जाधव यांच्या एका गाईने रानडुक्कर मारण्यासाठी वापरले जाणारे स्फोटक गोळे खाल्ले तोंडात स्फोट होऊन गाय जागेवरच तडफडून मेली यामुळे वसंतनगर येथील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
तालुक्यातील वसंतनगर तांडा येथील बबलु झिता जाधव यांचे शेत दळवेल फाँरेस्ट लगत आहे. या शिवारात काही दिवसांपासून सातत्याने रात्री वन्य प्राण्यांची शिकार होत आहे. फाँरेस्ट लगतच्या शेतकर्यांनी वेळोवेळी वन अधिकारी यांना तक्रारी देऊनसुद्धा चौकशी वनविभागाकडुन होत नाही. पारोळा उपविभागीय वन अधिकारी झोपेत आहेत. काही दिवसांमध्ये फाँरेस्टलगत असणार्या शेतात वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येक शेतकर्यांने शेतात कुत्रे पाळली होती, ती हे स्फोटके खाऊन मेले तेंव्हापण गावकर्यांनी तक्रार देऊनही वन अधिकारी यांनी दखल घेतली नव्हती.
आधी कुत्रे मेले , आता गाय आणि उद्या माणसाचा पाय या गोळ्यांवर ठेवला गेला तर याचा स्फोट होऊन माणसेही मरतील असे गावकर्यांचे म्हणणे आहे, वन अधिकारी देसले , बोराडे , श्रीमती सुर्यवंशी यांना गावकर्यांनी घटनास्थळी बोलवणे केले परंतु ते आले नाही. गावकर्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे फाँरेस्ट लगत असणार्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
बबलु जाधव यांच्या मेलेल्या गाईचा पंचनामा करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन गोळे ठेवणार्या व्यक्तीचा कायमचा बंदोबस्त करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वसंतनगर तांड्याचे सरपंच राजाराम जाधव, उपसरपंच शामभाऊ जाधव, तुकाराम जाधव, पांडुरंग जाधव, पंडित जाधव, बबलु जाधव, अनिल जाधव, जोगीलाल जाधव, निरंजन जाधव व गावकर्यांनी केली आहे. अखिल भारतीय बंजारा शेतकरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, वन विभागीय अधिकारी तसेच महसूल व वनमंत्री यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शाम जाधव यांनी सांगितले