वसंतवाडी ता.जळगाव ( प्रतिनिधी ) – येथे म्हसावद बोरणार गटाचे जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे यांच्या निधितुन शाळा खोली मंजूर झाली आहे या शाळा खोली बांधकामांचे भुमी पुजन जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण रामदास पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी वसंतवाडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच गजमल पवार, युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील, वसंतवाडी तंटामुक्तज्ञ अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे, जेष्ठ नागरिक बाबु चव्हाण तसेच हंसराज राठोड, रामलाल चव्हाण, ममराज चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
याठिकाणी पवन भाऊ सोनवणे यांनी ग्रामस्थांची शाळा खोली बांधकामांची मागणी मान्य करून त्वरित शाळा खोलीचे बांधकाम सुरू केले त्यामुळे येथील पालकवर्ग व ग्रामस्थ यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.