जळगाव – सेवाभावी संस्थांचा कुंभमेळा म्हणून प्रख्यात ‘मल्हार हेल्प फेअर ४’ पुन्हा जळगावकरांच्या भेटीला येत असून येत्या १२, १३ व १४ मार्च दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर याचे आयोजन होणार आहे. या ३ दिवसीय प्रदर्शनात अनेक कार्यक्रमाव्यतिरिक्त खाद्यजत्रेचे आयोजन करण्यात येते. यात फूड स्टॉल म्हणून सहभागी होण्याकरिता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु झाली आहे.
मल्हार कम्युनिकेशन्स व लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मल्हार हेल्प फेअर’ हा समाजातील गरजूंना निस्वार्थ भावाने मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक संस्था व सेवामहर्षींच्या कार्याला सलाम करणारा एक आगळावेगळा उपक्रम आहे. समाजाला प्रेरणा देणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने, सेवाभावी संस्थांसाठी कार्यशाळा, सेवदूतांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यजत्रा इ. सारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन यामध्ये केले जाते व दरवर्षी असंख्य लोक या महोत्सवाला भेट देऊन मदतीचे हजारो हात प्रत्यक्ष अनुभवतात. हेल्प फेअरच्या माध्यमातून इतरांना रोजगाराची संधी मिळावी या हेतूने खाद्यजत्रेत महिला बचत गटांना आमंत्रित केले जाते. याच अनुषंगाने नावनोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असून स्टॉल्सची संख्या मर्यादित असल्याने इच्छुक महिला बचत गटांनी निखिल शिंदे यांना 8446101752 वर त्वरित संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.