जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात शार्टसर्कीटमुळे धावत्या आयशरला आग लागल्याची घटना दुपारी घडली. अग्निशमन बंबाने ही आग तातडीने विझविल्याने घटना टळली.
शहरातील आकाशवाणी चौकाजवळ आयशर (ट्रक क्रं. एमएच ०४ ईबी ७१७९) वरील चालक हा जैन पाईपमधून पाईप घेऊन नांदेडकडे जात होता. परंतु गाडीच्या इंजिनच्या वायरींमध्ये शॉर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ मनपाच्या अग्निशामन विभागाला माहिती दिली. अवघ्या काही मिनीटातच बंब घटनास्थळी दाखल झाला. बंबाने पाण्याचा मारा केल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.