जळगाव ( प्रतिनिधी ) – माहेरहून ५० हजार रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ परिसरातील माहेर असलेल्या विवाहिता श्वेता राजा हरित (वय-४०) यांचा विवाह वसंत नगर वसई, मुंबई येथील राजा ब्रह्मानंद हरित यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीला एक आठवड्यानंतर पती राजा ब्रह्मानंद हरित यांनी माहेरहून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहिता यांना शिवीगाळ व गांजपाठ केला. त्यानंतर विवाहिता यांनी ५० हजाराची पूर्तता न केल्यामुळे पती राजा हरित यांनी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. यामध्ये सासू आणि सासरे यांनी देखील गांजपाठ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता या जळगाव येथील महाबळ येथे माहेरी निघून आल्या. यासंदर्भात गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पतीराजा ब्रह्मानंद हरित, सासु माया ब्रह्मानंद हरित, सासरे ब्रह्मानंद शामदेव हरित सर्व रा. वसंत नगर, वसई पूर्व, मुंबई यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस कर्मचारी रत्ना मराठे करीत आहे.