जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील आयटीआय जवळ शौचास जाणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा भरधाव ट्रकने धडकेत मृत्यू झाला होता. अपघातानंतर न थांबता ट्रकचालक सुसाट धुळ्याच्या दिशेने पसार झाला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमणबाई रामराव पाथरवट (वय-६५) या शहरातील भगिरथ कॉलनी येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास असून मातीचे माठ विक्री करुन उदनिर्वाह चालवतात. त्या महिला आयटीआय जवळ रस्त्यावर माठविक्री करतात आणि तत्पुत्या झोपड्या उभारून तेथेच वास्तव्यास आहेत. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता रमणबाई पाथरवट या शौचास निघाल्या होत्या. महामार्गाच्या बाजुने पायी चालत असतांना आकाशवाणी चौकाकडून सुसाट वेगात आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता धुळ्याच्या दिशेने पसार झाला. अपघातात जखमी रमणबाई यांचा मृत्यू झाला होता. बारा दिवसानंतर गुरूवार २४ फेब्रुवारी रोजी मयत महिलेचा मुलगा भैय्यासाहेब राजेंद्र पाथरवट यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.