जळगाव ( प्रतिनिधी ) – चोपडा विधानसभा मतदारसंघार्गत समावेश असलेल्या यावल तालुक्यातील मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यात
चांदनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने पाच कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
राज्य शासनातर्फे पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे अवर सचिव र. ज. कदम यांनी दिलेला आदेश जळगाव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यांना नुकताच प्राप्त झाला.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाठविलेला प्रस्तावाच्या मंजुरीसाठी चोपडयाच्या आमदार लता सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
आमदार लता सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला. या
निधीतून कम्युनिटी हॉल, प्रसाधनगृह, सस्पेन्शन ब्रीज, पगोडा, वॉच टॉवर, ट्रेकिंग रोड, सेल्फी पॉईंट, रोडसाईड बांबू प्लांटेशन, लॅन्डस
चिल्ड्रन पार्क, स्टॅच्यू अॅण्ड स्क्ल्पचर्स आणि इतर सुविधायुक्त पर्यटन विकासकामे होणार आहेत काळभैरव देवस्थान मंदिराच्या सभामंडप उभारणीच्या कामासाठी ५० लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
आमदार लता सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
विधानसभा मतदारसंघातील रस्ते, जोडरस्ते , पेयजल योजनेंतर्गत एकूण तीनशे कोटींची कामे मंजूर आहेत, अशी माहिती आमदार लता सोनवणे यांनी दिली.