नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे कौतुक केले आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात केंद्र सरकार, राज्य सरकारे, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, जेव्हा आपण अमेरिका, युरोपकडे पाहतो तेव्हा हे समजेल कि आपण त्यांच्यापेक्षा खूप समोर आहोत. जर आपण ही संधी याच प्रकारे वापरली तर भारत पुढे जाईल आणि येत्या काही दिवसांत भारत एक जागतिक लीडर बनेल. तत्पूर्वी अधीर रंजन यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाऊन संपल्यानंतर देशाच्या विविध भागात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी विनामुल्य प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.