पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील एम एम महाविद्यालयात कार्यरत क्रीडाशिक्षक प्रा गिरीष पाटील यांना जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे जिल्हा क्रीडा आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर जयश्री महाजन, राज्य माध्यमिक शिक्षक महासंघाचे सचिव शालीग्राम भिरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, महानगरपालिकेचे उपायुक्त उदय पाटील, राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ प्रदीप तळवलकर , राजेश जाधव उपस्थित होते.
प्रा गिरीष पाटील हे पाचोरा येथील एम एम महाविद्यालयत क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा समन्वयक म्हणून कार्यरत असून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हा क्रीडा आदर्शशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा चेअरमन व्ही टी जोशी, कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुरेश देवरे, संचालक डॉ जयवंत पाटील, प्राचार्य वासुदेव वले , उपप्राचार्य जी बी पाटील, पर्यवेक्षक एस एम पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा राजेश मांडोळे, भडगाव शाळेचे मुख्याध्यापक विश्वास साळुंखे , गो से हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधीर पाटील , प्रा संदीप पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.