जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व निवडक क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच शारीरिक शिक्षण शिक्षक आणि क्रीडा विषयक समस्या, नोकर भरतीबाबत चर्चा करणेसाठी भारतीय ऑलिंपिकचे सहसचिव नामदेवराव शिरगावकर यांच्या पुढाकाराने पुणे येथे बैठक झाली.
या बैठकीत शारीरिक शिक्षक व क्रीडा संघटनांचे निमंत्रित सदस्य उपस्थित होते. मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण संचालक पद निर्मिती, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात शारीरिक शिक्षण शिक्षक भरती व विविध प्रश्ना संदर्भात नामदेव शिरगावकर यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र ऑलिंम्पिकच्या वतीने मिनी ऑलिंपिक स्पर्धा आयोजन करताना क्रीडा संघटकांबरोबर शारीरिक शिक्षकांना बरोबर घेतले जाईल.प्रत्येक खेळ गावपातळीवर पोहचविण्याचा ऑलिंम्पिक असोसिएशन प्रयत्न करणार आहे. शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयातील होणारे नवनवीन बदल
शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑलिंम्पिक असोसिएशन शासनाचे सहकार्याने मदत करणार असल्याचे नामदेव शिरगावकर यांनी सांगितले.
या वेळी ऑलिंम्पिक असोशिएशनचे सहसचिव दयानंद, कार्यकारी अधिकारी राजेंद्र घुले उपस्थित होते. सभेच्या नियोजनात शिवाजी साळुंके यांनी मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्र शारीरिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे – पुणे, राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संदिप मनोरे – जळगांव, महासचिव तायाप्पा शेंडगे – सातारा, क्रिडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष.राजेंद्र कोतकर – अहमदनगर, .मच्छिंद्र ओव्हळ, .शिवदत्त ढवळे -अमरावती, राज्य क्रीडा विकास परिषद सचिव ज्ञानेश काळे – सातारा, राज्य क्रीडा संघर्ष समितीचे.अविनाश ओंबासे – कल्याण, मनोज माळी, अनिल एटम, महाराष्ट्र शालेय खेळ बचाव समितीचे शाम भोसले, शिवाजी साळुंके – पुणे, क्रीडा विकास परिषदेचे अशोक सरोदे, पुरुषोत्तम जगताप, मुंबई महानगर पालिका युनीटचे डॉ जितेंद्र लिंबकर – मुबंई, पँथर स्पोर्ट्सचे संजय कांबळे, युवा महासंघचे समन्वय गणेश जोरावर – सोलापूर , लखन मोरे – पुणे हे उपस्थित होते.