जळगाव ( प्रतिनिधी ) – दुसऱ्याच्या मालकीचा म्हणजे मूळ मालकाचा ३५ लाखांचा भूखंड बनावट आधार व पॅन कार्ड वापरून आणि बनावट साक्षीदारांची ओळख दाखवून तिसऱ्यानेच विकल्याचे मूळ मालकाने तलाठी कार्यालयात चौकशी केल्यानंतर उघडकीस आले . मूळ मालकाने एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
सुरेशचंद्र मांगीलाल बाफना यांनी ७ जून २००७ रोजी धरमचद दिवराज सेठीया यांचे कडुन मेहरूण शिवारातील सर्वे नं. 163/1 भूखंड खरेदी केला होता.आता हा भूखंड विक्री करणे असल्याने बाफना २४ जानेवारीरोजी तलाठी ऑफीस येथून 7/12 उतारा प्राप्त करून घेतला तेव्हा त्यांचे नाव कमी झालेले दिसले उता-यावर इमाम मुख्तार तांबाळी, रजीयाबी मुस्ताक खटीक, शेख अयुब शेख युसुफ तांबोडी, शेख जुबेर शेख सलाम खाटीक याचे नाव लागलेले दिसले त्यानंतर बाफना यांनी दुख्यम निबंधक कार्यालयात जाऊन माहीती घेतली तो प्लॉट दस्त क्रमांक 756/2021 नुसार २ मार्च , २०२१ रोजी खरेदी झाल्याचे दिसून आले. तो प्लाट इम्रान मुख्तार ( रा. प्लॉट नं. 45, इंद्रप्रस्थनगर, एम. आग.डी.सी., जळगाव , आधार कार्ड 381266183142 याच्या नावावर झालेला दिसला त्याने हा प्लॉट सुरेशचंद्र बाफना यांचे कडुन 5.84,000/- रु किमतीला खरेदी केल्याचे दिसून आले. खरेदी खतावर सुरेशचंद्र बाफना याचे नावाचे समोर बनावट सही व दुस-याच इसमाचा फोटो असल्याचे दिसले, खरेदी खतासोबत जोडलेले पॅनकार्ड व आधारकार्ड बाफना यांच्या नावाचे परंतु त्यावर दुस-या इसमाचे फोटो लावलेले दिसले. त्या खरेदी खतावर ओळखणार म्हणून अरुणा दिलीप चौधरी ( एल.आय.सी कॉलनी ) , फखरहेमदुला खाटीक ( मास्टर कॉलनी ) असे असल्याचे दिसून आले.