जळगाव (प्रतिनिधी) – औरंगाबाद मार्गाला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीतील आदित्य लॉन्सच्या जागेचा वाणिज्य वापर थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या जागेचे मालक सुनील मंत्री यांना १४ फेबुवारी रोजी दिले आहेत.
शासनाच्या धोरणानुसार या जागेचा वापर औद्योगिक प्रयोजनासाठी होणे अपेक्षित आहे. मात्र तेथे नियमांचे उल्लंघन करून वाणिज्य वापर सुरु होता म्हणून चंद्रशेखर मंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अँड. अतुल सूर्यवंशी व अँड. अजित वाघ यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या सुनावणीनंतर मेहरूण शिवारातील गट. नंबर ७९ मधील या जागेचा वाणिज्य वापर थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे. यापूर्वी २०१७ साली या जागेच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा रद्द करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात पुढे म्हटले आहे की, मेहरूण शिवारातील गट नं.७८ या जागेचा वापर आनाधीकृतपणे वाणिज्य कारणासाठी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. सरकारच्या नियमानुसार ओद्योगिक प्रयोजनासाठी या जागेचा वापर करण्याची परवानगी आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुनील मंत्री यांना २०१५ सालात दिलेली ओद्योगिक प्रयोजनासाठीची बिनशेती परवानगीसुद्धा रद्द केली आहे. गट नं.७८ मधील जागेचे क्षेत्रफळ १२ हजार 200 चोरास मीटर व गट नं.७९ मधील जागेचे क्षेत्रफळ ५ हजार 200 चौ.मी. आहे.