जळगाव (प्रतिनिधी) – येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स जवळ एका दुकानात कामानिमित्त आलेल्या व्यापाऱ्याच्या खिशातून अज्ञात भामट्याने २० हजारांचा मोबाईल काढून नेल्याची घटना उघडकीस आली असून मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, व्यापारी गुरफान उस्मान शेख (वय-३३) १४ रोजी सायंकाळी कामानिमीत्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये आले. अज्ञात चेारट्याने त्यांच्या खिश्यातून २० हजारांचा मोबाईल त्यांना न समजता अलगदरीत्या काढून नेत पलायन केले. मोबाईलच्या चोरीची घटना लक्षात येताच शेख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पेालिस नाईक सुभान तडवी तापास करत आहेत.