जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना मेस्कोमाता नगर परिसरात उघडकीस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, बादलसिंग भिमसिंग जोहरी (वय-४०) रा. मेस्कोमाता नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात . त्यांची दुचाकी (एमएच १९ डीजी ८६६) १० रोजी घरासमोर पार्कींग करून लावली होती. मात्र यानंतर कुणीतरी अज्ञात चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे सकाळी लक्षात आले. दुचाकींचा शोध घेऊनही ती सापडली नाही. याबाबत शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक मनोज येऊलकर तपास करीत आहे.