जळगाव ( प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पिंप्राळातून एकाची १२ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास सुकदेव धनगर (वय-४१) रा. वाटीकाश्रम पाठीमागे जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पिंप्राळा येथील बुधवारचा बाजार असल्याने ९ फेब्रुवारी रोजी रामदास धनगर हे मोटारसायकल (एमएच १९ बीएस २०६२) ने सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पिंप्राळ्यातील सिध्दीविनायक मंदीराजवळ त्यांची दुचाकी पार्क करून लावली. बाजार करून सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून मोटारसायकल मिळाली नाही. अखेर शनिवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नाना शिरसाठ करीत आहे.