दोन जखमी ; एक गंभीर ; हॉटेल कृष्णा जवळील घटना
एरंडोल (प्रतिनिधी )) – जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने एरंडोल कडून जळगावकडे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून यात दोन जखमी तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला एरंडोल येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून महामार्गावरील हॉटेल कृष्णा हॉटेल जवळ हा आज सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी आणि नागरिकांनी धाव घेतली. प्रकाश बागलेचा, कमलाबाई जैन अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जळगावातील शांतीलाल जैन हे आपल्या परिवारसह जळगावकडे जात असताना भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत शांतीलाल जैन ‘यांचा मुलगा व मुलगी जखमी झाले असून मामा आणि आई मयत झाले.
घटनास्थळी एरंडोल पोलीस स्टेशनचे हे.काँ. राजेश पाटील, काशिनाथ पाटील, अनिल पाटील, पंकज पाटील यांनी वाहतूक सुरळीत करुन तात्काळ जखमींना उपचारासाठी दवाखान्यात रवाना केले .