कजगाव ता. भडगाव(प्रतिनिधी ) – सध्या विवाह म्हटलं म्हणजे पत्रिका वाटणे लग्नाची जय्यत तयारी करणे व विविध धावपळ होत असते व अमर्याद खर्च होतो अश्या अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. विवाहासाठी दोन्हीकडील मंडळीना परिणामी आर्थिक भारही सोसावा लागतो. मात्र ह्या सर्व गोष्टींना फाटा देऊन मुस्लिम समाजाती तरुणाने एक नवीन आदर्श सर्वांसमोर निर्माण केला आहे.
गावातील फ्रुट व्यवसायिक समद मणियार हे नातेवाईकांसमवेत आपले चिरंजीव आवेश साठी वाशीम येथे मुलगी बघायला गेले. मुलगी व मुलगा एकमेकांना पसंद ही झालेत. नातेवाईक मंडळी लग्नाच्या तारखे बाबत हितगूज करीत असतांना समाजातील प्रतिष्ठित मंडळी व नातेवाईकानीं लग्न आताच उरकू टाकावे असा प्रस्ताव दोन्ही कडील नातेवाईकांसमोर ठेवला. याला होकार देत सर्वानीच परवानगी दिली व लग्न सोहळा आताच करून टाकावा असे ठरले. यावेळी मणियार बिरदारीचे नांदेड जिल्हाध्यक्ष हसन मोहंमद ,अब्दुल गणी, अर्धापूरचे नगरसेवक सुलतान मणियार शेख, मुनिर शेख जमिल व मुलाचे मोठे वडील माजी ग्रा प सदस्य हाजी शफी मणियार ,शाकिर मणियार ,मुस्ताक मणियार, मुलाचे मामा डॉ फारुख मणियार, युनूस मणियार, शाकिर सत्तार मणियार , भाऊ आसिफ मणियार, अनिस मणियार, सादिक मणियार, निसार भिकारी मणियार, मुशीर मणियार, फारुख मणियार, सादिक मणियार, शाहिद मणियार मुलामुलीचे आई वडील व दोन्हीकडील नातेवाईक मंडळी आदी उपस्थितीत होते. अगदी छोटेखानी पद्धतीने विवाह सोहळा संपन्न केल्याने मणियार बिरदारीने एक नवीन आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.