जळगाव (प्रतिनिधी)ओटीपी विचारुन बँक अकाउंटमधून परस्पर ३० हजार ९३७ रुपये काढून जळगावात एकाची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रवीणकुमार दशरथ खरात (वय ४४ रा. अयोध्यानगर ता. जि. जळगाव) हे १० फेब्रुवारी घरी असतांना रोजी दुपारी २.४० वाजेच्या दरम्यान त्यांना ९८२७४५९२७५, ७८५८०७६६७२, ६२८९७६५६९५ या मोबाईल धारकाकडून (नाव-गाव माहित नाही)एनिडेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर आलेला ओटीपी प्रविणकुमार यांना विचारला.ओटीपी सांगितल्यानंतर समोरील व्यक्तीने पुन्हा प्रवीणकुमार यांना ‘फोन पे’ वर कार्ड स्कॅन करण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने प्रविणकुमार यांच्या बँक अकाउंटमधून ३०,९३७ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात संबंधित मोवाईल नंबर धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि रविंद्र गिरासे हे करीत आहेत.