जळगाव(प्रतिनिधी ) – शहरातील तांबापुरा भागात एका १६ वर्षीय मुलावर इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवीत असल्याच्या कारणावरून याचा राग मनात धरून चौघांनी लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाणीत तो जखमी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी आरोपी समीर याला पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शादाब गफार मन्यार हा ११ रोजी दुपारी नमाज वरुन घरी येत असतांना समीर हनीफ काकर, शाहील पुण नांव माहीत नाही अशांनी तु व्हीडीओ का बनवितो असे व्हीडीओ बनवून का टाकतो असे बोलून दमदाटी केली.तसेच रात्री ८ वाजता समीर हनीफ काककर व सहील यांच्यासह चौघांनी घरातून बाहेर बोलावून त्याला जबर मारहाण केली. यात तो जखमी झाला आहे.
तर या हल्ल्यात जखमी झालेल्या शादाब मन्यार याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यात चौघांनी शादाबवर लोखंडी रॉडने वार केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तांबापुरात भांडण झाल्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती एमआयडीसी पोलिस सहाय्यक फौजदार आनंद सिंग पाटील, गणेश शिरसाळे मिलिंद सोनवणे ,इमरान बेग यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. भांडण करणारा समीर यास मेहरून तलाव परिसरातून रात्रीच पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, नितीन पाटील, सचिन पाटील, योगेश बारी यांनी ताब्यात घेतले होते. त्यास अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज रोजी तपासी अधिकारी अल्ताफ पठाण यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलिस कस्टडी रिमांड दिलेली आहे त्याचा इतर साथीदारांचा शोध सुरू असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे